मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

राज्यात नवीन मातृवंदन योजना राबविणार - २२ नोव्हेंबर २०१७

राज्यात नवीन मातृवंदन योजना राबविणार - २२ नोव्हेंबर २०१७

* देशातील माता व बालकांचे आरोग्य सुदृढ राखून माता व बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री मातृवंदन योजना १ जानेवारी २०१८ पासून महाराष्ट्रात लागू होणार आहे.

* या योजनेत महिलांना पहिल्या प्रसूतीदरम्यान ५ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे. केंद्र आणि राज्याच्या शासकीय आणि निमशासकीय सेवेत असणाऱ्या महिला वगळता सर्व महिला या योजनेसाठी पात्र असतील.

* विशेष म्हणजे २०१७ मध्ये पहिली प्रसूती झालेल्या माताही या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. गेल्याच वर्षी भारतातील अन्य राज्यामध्ये केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाची ही योजना सुरु करण्यात आली आहे.

* मात्र महाराष्ट्रमध्ये ही योजना महिला व बालकल्याण विभागाने राबवायची की आरोग्य विभागाने राबवायची याचा लवकर निर्णय झाला नाही.

* ही योजना केवळ पहिल्याच अपत्यासाठी व सरकारने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी झालेल्या महिलांना लागू असून, लाभार्थी पाच हजार रुपये रक्कम तीन टप्प्यात संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात थेट जमा होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.