गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

ब्रिक्स देशातील विद्यापीठांची क्रमवारी जाहीर - २४ नोव्हेंबर २०१७

ब्रिक्स देशातील विद्यापीठांची क्रमवारी जाहीर - २४ नोव्हेंबर २०१७

* जगभरातील शिक्षणसंस्थांची क्रमवारी जाहीर करणाऱ्या क्यूएस संस्थेने जाहीर केलेल्या ब्रिक्स राष्ट्रातील शिक्षणसंस्थांच्या क्रमवारीत आयआयटी मुंबईने ९ वे स्थान मिळविले आहे.

* बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आयआयएससी दहाव्या स्थानावर आहे. देशातील साधारण ४५ शिक्षणसंस्थांना या क्रमवारीत पहिल्या दोनशे संस्थांमध्ये स्थान मिळाले आहे.

* क्यूएस या संस्थेकडून जगातील उच्चशिक्षण संस्थांची पाहणी करण्यात येते. संस्थांमधील पायाभूत संस्था, विद्यार्थी आणि शिक्षणाचे गुणोत्तर, शिक्षण पूर्ण केल्यानंतर मिळणारा प्रतिसाद, शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नोकरीच्या संधी, या घटकावर अवलंबून असते.

* या क्रमवारीत आयआयटी दिल्ली १७, मद्रास १८, कानपुर २१, खरगपूर २४ आणि दिल्ली विद्यापीठ ४१ यांनी पहिल्या ५० विद्यापीठामध्ये स्थान मिळवले होते.

* या क्रमवारीत ब्रिक्स देश म्हणजे ब्राझील, चीन, भारत, रशिया, आणि दक्षिण आफ्रिका या देशामधील सुमारे ९ हजार शिक्षण संस्थांचा विचार करण्यात आला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.