बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

देशात महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत गोवा हे सर्वात सुरक्षित राज्य - २ नोव्हेंबर २०१७

देशात महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत गोवा हे सर्वात सुरक्षित राज्य - २ नोव्हेंबर २०१७

* महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा हे देशातील सर्वात सुरक्षित राज्य आहे. तर देशातील राजधानी दिल्लीसह उत्तरभारतातील राज्ये महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित आहे.

* प्लॅन इंडिया द्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. देशभरातील राज्यांच्या विचार केल्यास महाराष्ट्र या यादीत ९ व्या स्थानावर आहे.

* महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा सर्वाधिक तर बिहार सर्वात असुरक्षित राज्य आहे. गोव्याखालोखाल केरळ, मिझोराम, सिक्कीम, मणिपूर, या राज्यचा क्रमांक लागतो.

* प्लॅन इंडियानुसार तयार करण्यात आलेला अहवाल बुधवारी महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला.

* या अहवालात महिला सुरक्षेसह शिक्षण, आरोग्य, गरिबी, हे मुद्दे विचारात घेण्यात आले आहे. महिला सुरक्षेच्या देशातील राज्यांना शून्य ते एक असे गुण देण्यात आले आहे.

* यात सर्वाधिक गोव्याला ०. ६५६ तर बिहारला सर्वात कमी म्हणजे ०. ४१० गुण देण्यात आले. याबाबतीत महाराष्ट्राला ०.५८० तर गुजरात १६ व्या स्थानावर आहे. देशाची सरासरी ०.५३१ एवढी आहे.

* महिला सुरक्षेसह इतरही अनेक क्षेत्रामध्ये गोव्याची कामगिरी चांगली आहे. गोवा शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत ५ व्या तर गरिबीच्या बाबतीत ८ व्या स्थानी आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.