शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०१७

जगातील सर्वाधिक कुपोषित बालके भारतात - ३ नोव्हेंबर २०१७

जगातील सर्वाधिक कुपोषित बालके भारतात - ३ नोव्हेंबर २०१७

* भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असल्याचा दावा केला जात असला तरी या विकासाची फळे सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

* त्यामुळेच कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत भारत पहिल्या स्थानावर असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

* असोचेम आणि ईवाय यांच्या संयुक्त सर्वेक्षणातून ही चिंताजनक माहिती पुढे आली. भारतात कुपोषणग्रस्त बालकांची संख्या सर्वाधिक असल्याचे हे सर्वेक्षण सांगते.

* कुपोषणाच्या विळख्यात सापडलेल्या जगातील एकूण बालकांपैकी ५०% बालके भारतातील आहेत. त्यामुळे सामाजिक असमानता दूर करण्यासाठी आणि धोरणांची आखणी करणे आवश्यक असल्याचे असोचेम आणि ईवाय अहवालात नमूद केले आहे.

* २००५ ते २०१५ या कालावधीत भारतातील बालमृत्यूचे प्रमाण मोठया प्रमाणात घटले आहे. मात्र या काळात कुपोषणाची समस्या वाढली आहे.

* २०१५ मध्ये देशातील ४०% बालके भारतातील आहेत. असे आकडेवारीतून समोर आले आहे. देशातील ३७% मुलांचे वजन त्यांच्या वयाच्या तुलनेत कमी आहे.

* एकीकडे देशात कुपोषणाची समस्या तीव्र असताना लठ्ठपणाची समस्यादेखील वाढताना दिसत आहे. या यादीत भारताचा क्रमांक जगात तिसरा आहे. अमेरिकेत लठ्ठपणाची समस्या अतिशय बिकट त्यानंतर चीनचा क्रमांक दिसले.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.