मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

प्रभाकर जोग यांना गदिमा पुरस्कार जाहीर - २२ नोव्हेंबर २०१७

प्रभाकर जोग यांना गदिमा पुरस्कार जाहीर - २२ नोव्हेंबर २०१७

* गीत रामायण च्या कार्यक्रमात व्हायोलिनची साथ केलेले अन आपल्या वादनातून गाणाऱ्या व्हायोलिनची अनुभूती देणारे ज्येष्ठ व्हायोलिन वादक-संगीत दिग्दर्शक प्रभाकर जोग यांना गदिमा प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार जाहीर झाला आहे.

* प्रतिष्ठानचे विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी मंगळवारी या पुरस्काराची घोषणा केली. आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी ग दि माडगूळकर ४० व्या स्मृतिदिनानिमित्त या पुरस्काराचे आयोजन केले जाईल.

* यावेळी कवी सुरेश भट यांच्या पत्नी पुष्पा भट यांना [गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार], निवेदिता धनश्री लेले यांना चैत्रबन पुरस्कार, तर गायिका सावनी रवींद्र यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार देण्यात येणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.