शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७

महाराष्ट्रात १०० आंतरराष्ट्रीय शाळा स्थापन करणार - २६ नोव्हेंबर २०१७

महाराष्ट्रात १०० आंतरराष्ट्रीय शाळा स्थापन करणार - २६ नोव्हेंबर २०१७

* जागतिक पातळीवर आपल्या विद्यार्थ्यांची ओळख निर्माण होण्यासाठी राज्यात आंतराष्ट्रीय पातळीवरील पद्धतीचे शिक्षण देणाऱ्या १०० आंतरराष्ट्रीय शाळा सुरु केल्या जातील.

* त्यातील पाहिली शाळा नंदुरबार येथे सुरु करण्यात येईल. अशी घोषणा राज्याचे शिक्षण आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका संमेलनात सांगितले.

* त्यांच्या मते शिक्षण व्यवस्थेत बदल स्वीकारण्याची तयारी आपण ठरवली पाहिजे. शिक्षण क्षेत्रातील विकास व बदलासाठी वेगळे मार्ग चोखाळण्याचा शिक्षण संस्थेच्या मागे शासन उभे राहील.

* मुंबईसारख्या महानगरातील नामांकित शाळातील विद्यार्थी व दुर्गम भागातील ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना एकाच पातळीवर आणण्याचे काम अशा शाळेतून केले जाईल.

* अशा शाळेतून महानगरातील विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी हे समान पातळीवर शिक्षण घेऊ शकतील. अशा प्रकारच्या शाळा  राज्यात मोठ्या प्रमाणावर स्थापन करण्यात येणार आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.