शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

किरण कुमार व प्रा शर्मा यांना फिरोदिया पुरस्कार - ५ नोव्हेंबर २०१७

किरण कुमार व प्रा शर्मा यांना फिरोदिया पुरस्कार - ५ नोव्हेंबर २०१७

* प्रतिष्ठेचा मानला जाणारा एच के फिरोदिया पुरस्कार यंदा इस्रोचे अध्यक्ष ए एस किरण कुमार विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा यांना जाहीर झाला आहे.

* या पुरस्काराचे वितरण १५ डिसेंबर रोजी नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार यांच्या हस्ते होईल. ग्लोबल रिसर्च आल्यायन्सचे आणि कायनेटिक ग्रुप अध्यक्ष अरुण फिरोदिया यांनी पत्रकार परिषदेत पुरस्कार्थीनी नावे जाहीर केली.

* एच के फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनतर्फे २२ वर्षांपासून हा पुरस्कार विज्ञान - तंत्रज्ञान क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना दिला जातो.

* तसेच यंदा किरण कुमार यांना विजयरत्न हा पुरस्कार दिला जाणार आहे. त्यांनी भारताच्या  अंतराळ मोहिमेत महत्वाची कामगिरी केली आहे.

* तसेच त्यांनी रिमोट सेन्सिंग कम्युनिकेशन सिस्टीम तयार केली. २०१४ मध्ये पदमश्री देऊन त्यांना केंद्र सरकारने गौरविले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.