सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

भारताची अर्थव्यवस्था २०२८ पर्यंत जपानला मागे टाकून ३ ऱ्या क्रमांकावर - १४ नोव्हेंबर २०१७

भारताची अर्थव्यवस्था २०२८ पर्यंत जपानला मागे टाकून ३ ऱ्या क्रमांकावर - १४ नोव्हेंबर २०१७

* भारताची अर्थव्यवस्था २०२८ सालापर्यंत जपानला मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. असे बँक ऑफ अमेरिका मेरीच लिंच या अमेरिकी ब्रोकरेज संस्थेने जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे.

* [इंडिया २०२८ : द लास्ट ब्रिक इन द वॉल] असे या अहवालाचे शीर्षक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे यापूर्वीच ब्राझील आणि रशियाला मागे टाकले असून ती आता चीनच्या पाठोपाठ [ब्रिक्स] देशामधील [ब्राझील, रशिया, भारत, चीन, आणि दक्षिण आफ्रिका] दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली असेल.

* यानंतर भारत २०१९ पर्यंत फ्रांस आणि ब्रिटनला मागे टाकून अमेरिका, चीन, जपान, व जर्मनीच्या पाठोपाठ जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली असेल.

* भारतीय अर्थव्यवस्थेने २०२८ पर्यंत नाममात्र सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत [अमेरिकी डॉलरमध्ये नॉमिनल जीडीपी] जर्मनी व जपानला मागे टाकले असेल.

* जपानचा सध्याचा विकास दर १.६% आहे. तर भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर आगामी काळात १० टक्क्यावर राहिल.

* भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार गेल्या वर्षी २.२६ ट्रिलियन डॉलर इतका होता. तो २०२८ मध्ये केवढा असेल हे मात्र अहवालात नमूद केलेले नाही.

* देशाची ही वाढ प्रामुख्याने सेवा क्षेत्राच्या कामगिरीमुळे होईल0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.