मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

राष्ट्रीय नफेखोरी प्राधिकरणाची औपचारिक स्थापना - २९ नोव्हेंबर २०१७

राष्ट्रीय नफेखोरी प्राधिकरणाची औपचारिक स्थापना - २९ नोव्हेंबर २०१७

* राष्ट्रीय नफेखोरीविरोधी प्राधिकरणाची औपचारिकरित्या स्थापना झाली असून, या संस्थेची अध्यक्षपदी सनदी अधिकारी बी एन शर्मा यांची नियुक्ती झाली आहे.

* अर्थमंत्रालयाने आज याबाबत घोषणा केली. १६ नोव्हेंबरला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्राधिकारणाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली.

* या प्राधिकरणात अध्यक्षांसोबत चार सहसचिव दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून, प्राधिकरणात ते तांत्रिक सदस्य असतील.

* या पदावर हिमाचल प्रदेशाच्या कर लवादाचे प्रमुख जी एस चौहान, कोलकाता जीएसटीचे प्रधान सचिव आयुक्त सी एल माहार, भाग्यदेवी एडीजी यांची निवड केली आहे.

* जीएसटी अस्तित्वात आल्यानंतर कराच्या रचनेमध्ये झालेल्या फेबदलाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना जीएसटीच लाभ पोहोचविणे, त्यांचा विश्वास वाढविणे आणि नफेखोरीला आळा घालणे यासाठी प्राधिकरणाने काम करणे अपेक्षित करणे.

* जीएसटीमधील अडचणी आणि त्यातील ग्राहकांच्या तक्रारी वाढल्यानंतर सरकारने राष्ट्रीय नफेखोरीविरोधी प्राधिकरण [नॅशनल अँटी प्रोफेटिंग अथॉरिटी] स्थापण्यास मंजुरी दिली जात होती.

* या अंतर्गत केंद्रीय पातळीवर आणि राज्यपातळीवर यंत्रणा स्थापन केली जाणार आहे. ग्राहकांना नफेखोरीविरुद्ध दाद मागता येईल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.