बुधवार, ८ नोव्हेंबर, २०१७

तेलंगणामध्ये शेतीला २४ तास वीज पुरवठा - ९ नोव्हेंबर २०१७

तेलंगणामध्ये शेतीला २४ तास वीज पुरवठा - ९ नोव्हेंबर २०१७

* राज्यातील शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करणारे तेलंगण हे देशातील पहिले राज्य बनले असल्याची घोषणा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज विधानमंडळामध्ये बोलताना केली आहे.

* तत्पूर्वी शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर मोफत वीज देण्याचाही सरकारचा विचार असल्याचे मुख्यमंत्र्यानी जाहीर केले आहे.

* मेडक, करीमनगर, आणि नळगोंडा या तीन जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्द करून दिली जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ऊर्जाविषयक समस्या मार्गी लावण्याचा आमचा विचार आहे.

* शेतकऱ्यांच्या २३ लाख कृषिपंपांना २४ तास वीज देण्याचा आमचा विचार असून त्यासाठी आमचे प्रशासन आतापासून काम करते आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.