शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

२०१७ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार कृष्णा सोबती यांना जाहीर - ४ नोव्हेंबर २०१७

२०१७ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार कृष्णा सोबती यांना जाहीर - ४ नोव्हेंबर २०१७

* ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा सोबती वय ९२ यांना यंदाचा २०१७ वर्षीचा ५३ वा प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार आज जाहीर करण्यात आला. 

* साहित्य क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. ज्ञानपीठ निवड समितीने ही घोषणा केली. यंदाचा ५३ वा ज्ञानपीठ पुरस्कार असून ११ लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे त्याचे स्वरूप आहे. 

* हिंदी आणि पंजाबी संस्कृतीचे प्रतिबिंब कृष्णा सोबती यांच्या लेखनात आढळते. थेट आणि धाडसी लेखन हे त्यांच्या साहित्याचे वैशिट्य मानले जाते. 

* सोबती या अत्यंत धाडसी लेखिका असून त्यांनी हिंदी साहित्य समृद्ध केले. असे निवड समितीचे अध्यक्ष आणि साहित्यिक नामवरसिंह यांनी सांगितले. 

* निवड समितीतील अन्य सदस्यांमध्ये गिरीश्वर मिश्रा, शमीम हनफी, हरीश त्रिवेदी, सुरंजन दास, रमाकांत रथ, चंद्रकांत पाटील, अलोक राय, सी राधाकृष्णन, मधुसूदन आनंद आणि लीलाधर मंडलोई यांचा समावेश होता. 

* भारत - पाकिस्तान फाळणी आणि स्त्री - पुरुष संबंध हे कृष्णा सोबती यांच्या लेखनाचे मुख्य विषय आहेत. 'दार से बिच्छूडी' 'मित्रो मरजानी' 'जिंदगीनामा' दिलो दानिश' 'ए लडकी'आणि गुजरात पाकिस्तान से गुजरात हिंदुस्थान' या त्यांच्या गाजलेल्या कलाकृती आहेत. 

* त्यांच्या साहित्याचा भारतीय भाषांबरोबरच स्वीडिश, रशियन आणि इंग्रजीमध्ये अनुवाद झाला आहे. हिंदी अकादमी फेलोशिप आणि पदमभूषणाच्या त्या मानकरी आहेत. 

* 'जिंदगीनामा' या कादंबरीसाठी कृष्णा सोबती यांना १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.