बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

ब्राह्मोस क्षेपणास्त्राची सुखोई लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी - २३ नोव्हेंबर २०१७

ब्राह्मोस क्षेपणास्त्राची सुखोई लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी - २३ नोव्हेंबर २०१७

* शत्रूच्या हद्दीत घुसून लक्ष्य भेदण्यास सक्षम, तसेच भारत आणि रशिया यांची संयुक्त निर्मिती असणारे स्वनानीत [सुपरसॉनिक क्रूझ] क्षेपणास्त्र बुधवारी भारतीय हवाई दलाच्या सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानावरून यशस्वी चाचणी करण्यात आली.

* भारतीय लष्करी सामर्थ्याच्या दृष्टीने ही ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे. सुमारे अडीच टन वजनाच्या या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात चाचणी घेण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

* डागल्यानंतर काही वेळेतच हे क्षेपणास्त्र बंगालच्या उपसागरातील पूर्वनियोजित लक्ष्यावर जाऊन आदळले. आजवर उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या माध्यमातून क्षेपणास्त्राच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

* भारताने पहिल्यांदाच अशा प्रकारच्या लढाऊ विमानाचा वापर या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रासाठी केला आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.