शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७

३१ वी दक्षिण आशियाई परिषद फिलिपाइन्स येथे आयोजित - १२ नोव्हेंबर २०१७

३१ वी दक्षिण आशियाई परिषद फिलिपाइन्स येथे आयोजित - १२ नोव्हेंबर २०१७

* आशियाई परिषदेत एकूण ११ देश सदस्य आहेत. या परिषदेत विविध मुद्यावर चर्चा केली जाते. आणि प्रामुख्याने व्यवसाय व राष्ट्रविकास यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येतात.

* या परिषदेचे सदस्य देश पुढीलप्रमाणे - इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम, ब्रुनेई, कंबोडिया, लाओस, म्यानमार, पूर्व तिमोर हे देश आहेत.

* दक्षिण आशियाई परिषदेची पहिली बैठक इंडोनेशिया मधील बाली येथे १९७६ रोजी घेण्यात आले होते.

* प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १५ व्या दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या [आशियन] भारत शिखर परिषदेसाठी आणि १२ व्या ईस्ट आशिया परिषदेसाठी उपस्थित राहण्यासाठी आज सकाळी फिलिपाइन्सला रवाना झाले.

* दोन्ही परिषदेत अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बैठक महत्वाची होणार आहे. तीन दिवसीय या परिषदेत आशियानच्या व्यवसायात आणि गुंतवणुकीसाठी चर्चा करतील.

* फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रोडिनो डुपरटे हे मोदींशी चर्चा करतील. सध्या रोडिनो हे आशियानचे अध्यक्ष आहेत.

* आशियानच्या त्यावेळेसच्या परिषदेला ५० वे वर्धापन याच्यानिमित्त रोडिओ यांच्यातर्फे विशेष आयोजन करण्यात आले आहे.

* भारत, अमेरिका, जापान, व ऑस्ट्रेलिया यांचा एक संयुक्त गट तयार करण्याच्या प्रस्तावानंतर दोघांमधील हि पहिलीच बैठक असेल.

* आशियान राष्ट्रासोबत भारताचा व्यापार हा इतर देशांच्या तुलनेत १० टक्क्याहून अधिक आहे. मनिला येथे प्रादेशिक परिषद होणार असून यात मोदीजी भारतासोबत व्यापार वाढविण्यावर भर देतील.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.