बुधवार, ८ नोव्हेंबर, २०१७

मेरी कोमला आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत पाचव्यांदा सुवर्णपदक - ९ नोव्हेंबर २०१७

मेरी कोमला आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत पाचव्यांदा सुवर्णपदक - ९ नोव्हेंबर २०१७

* भारतीय बॉक्सिंगमधील वंडर गर्ल एम सी मेरी कोम हिने [४८] किलो गटात आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत पाचव्यांदा सुवर्णपदक आपल्या नावावर केले. तर सोनिया लाथेर ५७ किलो हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

* पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या मेरी कोमने उत्तर कोरियाच्या किम ह्यांग मि हिचा ५-० असा धुव्वा उडवला.

* मेरी कोमचे हे २०१४ च्या आशियाई स्पर्धेनंतरचे पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे. तसेच या वर्षातील हे तिचे पहिले पदक आहे. तिने आशियाई स्पर्धेत २००३,२००५,२०१० आणि २०१२ मध्ये या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

* ३५ वर्षीय मेरी कोमने आज काल झालेल्या स्पर्धेत एक सुवर्णपदक जिंकून भारताला या स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य, व ५ कास्यपदके जिंकली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.