बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

फेसबुक देणार ५ लाख भारतीयांना डिजिटल स्किल प्रशिक्षण - २३ नोव्हेंबर २०१७

फेसबुक देणार ५ लाख भारतीयांना डिजिटल स्किल प्रशिक्षण - २३ नोव्हेंबर २०१७

* २०२० पर्यंत ५ लाख भारतीयांना डिजिटल स्किल शिकवणार असे फेसबुकने जाहीर केले आहे. कंपनीकडून एका नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. जे स्टार्टअप म्हणून आणि वैयक्तिक स्तरावर फायद्याचा असेल.

* फेसबुकने भारतात दोन उपक्रमांची सुरुवात केली. ज्यामध्ये फेसबुक डिजिटल ट्रेनींग आणि फेसबुक स्टार्टअप ट्रेनींग हब यांचा समावेश असेल. विशेष म्हणजे फेसबुकने भारतातून याची सुरवात केली आहे.

* फेसबुक डिजिटल ट्रेनींग आणि स्टार्टअप ट्रेनींग असे दोन महत्वाचे प्रशिक्षण देणार आहे. डिजिटल ट्रेनींग हा एक ऑनलाईन प्रशिक्षण शिक्षण असेल त्यात डिजिटल मार्केटिंगचे शिक्षण दिले जाणार आहे.

* स्टार्टअप ट्रेनींग मध्ये डेव्हलपर्स आणि नवीन उद्योग स्टार्टअपला प्रभावी पद्धतीने व्यवसाय करणे आणि चांगल्या प्रोडक्ट्चे प्रकार याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

* यासारख्या कार्यक्रमामुळे भारतात डिजिटल साक्षरता वाढून भारत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांत विकास साधू शकेल. असे फेसबुकला वाटते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.