सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

कुत्रिम बुद्धिमत्तेचा जगातील पहिला आभासी राजकारणी - २८ नोव्हेंबर २०१७

कुत्रिम बुद्धिमत्तेचा जगातील पहिला आभासी राजकारणी - २८ नोव्हेंबर २०१७

* आर्टिफिशिअल इंटेलिजन्स [एआय] मानवी बुद्धिमत्तेला आव्हाहन निर्माण करून भविष्यात मानवजातीसाठी धोका निर्माण होऊ शकतो. असे स्टीफन्स हॉकिन्स यांनी सांगितले.

* तरी आता कुत्रिम बुद्धिमत्ता असलेला [सॅम] हा पहिला आभासी व्हर्च्युअल राजकारणी न्यूझीलँडमध्ये उदयास येत आहे.

* याआधी सौदी अरेबियाने नागरिकत्व दिल्याने सोफिया नावाची नागरिक जगासमोर आली आहे. स्वतःहून एआयला अधिकार देत असल्याचे पाहून शस्त्रज्ञानी दिलेला इशारा बरोबरच आहे.

* जगातील पहिला एआय असलेला राजकारणी हा शिक्षण, गृहनिर्माण आणि इतर स्थानिक प्रश्नावर उत्तरे देऊ शकतो.

* निक जेरिटसन या संशोधकाने या सॅम नावाच्या कुत्रिम राजकारणाऱ्याला तयार केले आहे. निक याच्या म्हणण्यानुसार अनेक देश आपले मूलभूत प्रश्न सोडवू शकले नाहीत.

* सॅम अदयाप प्राथमिक अवस्थेत असला तरीही न्यूझीलँडमध्ये २०२० मध्ये होणाऱ्या अवस्थेत तो उमेदवार म्हणून उभा राहू शकेल. इतकी सुधारणा त्यात करता येऊ शकेल.

* या रोबो उमेदवाराला अदयाप कायद्याची मान्यता नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, सर्वेक्षण करणे, आणि त्यातून निष्कर्ष काढणे अशा गोष्टी सॅम शिकत आहे.

* हा रोबो म्हणतो की माझी स्मरणशक्ती अमर्याद आहे. त्यामुळे तुम्ही जे सांगाल ते मी कधीही विसरू शकणार नाही. निर्णय घेताना माझ्याकडून कोणताही भेदभाव होणार नाही.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.