शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी प्रकल्पाचे आज भूमिपूजन - ५ नोव्हेंबर २०१७

मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी प्रकल्पाचे आज भूमिपूजन - ५ नोव्हेंबर २०१७

* ज्या राळेगणसिद्धीतुन येथे शनिवारी [मुख्यमंत्री सौरऊर्जा वाहिनी प्रकल्पाचे भूमिपूजन आणि ग्रामरक्षक दलाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच मेळावा झाला.

* सौरऊर्जा प्रकल्प व ग्रामरक्षक दल या देशाला पथदर्शी ठरणाऱ्या दोन योजनांचा प्रारंभ अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीमधून होत असल्याने हा ऐतिहासिक दिवस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

* सौरऊर्जा प्रकल्प आणि ग्रामसुरक्षा दल कायद्याची अंमलबजावणी देशात राळेगणसिद्धीतूनच प्रथम होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना १२ तास वीज मिळणार आहे.

* आतापर्यंत विहीर पुनर्भरण व्हायचे, परंतु आता अख्य्या पाणलोटाचेच पुनर्भरण हा अण्णांचा मंत्र घेऊन भविष्यात राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.