सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

देशातील ब्रॉडबँड भारतनेट प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ - १४ नोव्हेंबर २०१७

देशातील ब्रॉडबँड भारतनेट प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ - १४ नोव्हेंबर २०१७

* देशातील सर्व ग्रामपंचायतींना हाय स्पीड ब्रॉड बँडद्वारे जोडणाऱ्या महत्वाकांक्षी [भारतनेट] प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ झाला.

* या प्रकल्पाअंतर्गत मार्च २०१९ पर्यंत आणखी दीड लाख ग्रामपंचायती जोडल्या जातील. या टप्प्यासाठी ३४ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

* ग्रामीण भागापर्यंत ब्रॉडबँड सेवा पोहोचविण्यासाठी राज्याशी सामंजस्य करार करण्यात आले आहे. त्यासाठी रिलायन्स जियो, भरती एअरटेल, आयडिया सेल्युलर, वोडाफोन या खाजगी बँड्सविथ साठी प्रयत्न केले जाणार आहेत.

* डिसेंबरअखेर पर्यंत देशातील तीन लाख गावामध्ये ब्रॉडबँड सेवा सुरु होणार असल्याचे मनोज सिन्हा यांनी या वेळी सांगितले आहे.

* केरळ, कर्नाटक, आणि केंद्रशासित प्रदेशांतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीना ब्रॉडबँड सेवा पोहोचली आहे.

* दृष्टिक्षेप भारतनेट प्रकल्प

* भारतनेट योजनेअंतर्गत देशातील २.५ लाख ग्रामपंचायतींना फायबर नेटवर्कद्वारे हायस्पीड ब्रॉडबँडने जोडण्यात येणार आहे.

* सरकार जिल्हा स्तरावरून ब्रॉडब्रँडला फायबरद्वारे गावात पोहोचविणार आहे. तेथे ग्रामीण भागातील नागरिकांना वितरकांच्या माध्यमातून किमान दराने ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पुरविली जाणार आहे.

* या प्रकल्पाअंतर्गत संपूर्ण देशात मार्च २०१९ पर्यंत भारत नेटचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी ५,१०,२०,५० रुपयासारखे विविध मासिक पॅक उपलब्द असतील.

* दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन २०२० पर्यंत भारत देश संपूर्ण वायफाय कनेक्टिव्हिटीचा देश बनणार आहे. संपूर्ण प्रकल्प ४५ हजार कोटी रुपयाच्या खर्चाचा भारत नेट पूर्णपणे भारतीय असणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.