रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

भारतात कॅशलेस व्यवहारात वाढ - २० नोव्हेंबर २०१७

भारतात कॅशलेस व्यवहारात वाढ - २० नोव्हेंबर २०१७

* केंद्र सरकाने कॅशलेस अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिल्याने डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून झालेल्या विक्रमी व्यवहारातून दिसून आले आहेत.

* पॉईंट ऑफ सेल [पीओएस] मशिनमधून होणाऱ्या व्यव्हारामधून ८६% टक्क्यांनी वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये पीओएसवर ३७८ दशलक्ष व्यवहार झाले.

* गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून ४० हजार १३० कोटींचे व्यवहार झाले होते. नोटबंदीनंतर ग्राहकांनी दैनंदिन व्यवहारामध्ये कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे वर्ल्डलाइन या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले.

* नोटबंदीचे सुरवातीचे काही महिने ग्राहकांनी डिजिटल माध्यमातून आर्थिक व्यवहार पूर्ण केले. जनधन योजनेपासून डेबिट  आणि क्रेडिट कार्डमधील व्यवहारामधून ३९ टक्क्यांनी वृद्धी दिसून आली.

* २०१६ ते २०१७ या कालावधीत क्रेडिट कार्डमधील व्यव्हारामध्ये २४ टक्क्यांनी वृद्धी झाली आहे. कार्डमधील वाढते व्यवहार डिजिटल पेमेंट कंपन्यांना पथ्यावर पडले आहे.

* गेल्या नोव्हेंबरपासून सप्टेंबर या १० महिन्यांच्या कालावधीत डिजिटल व्यवहारामध्ये सरासरी ३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.