रविवार, ५ नोव्हेंबर, २०१७

निर्मला गोगटे आणि बाबा पार्सेकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर - ६ नोव्हेंबर २०१७

निर्मला गोगटे आणि बाबा पार्सेकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर - ६ नोव्हेंबर २०१७

* राज्य शासनाचा [नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार] ज्येष्ठ नेपथ्यकर बाबा बाबा पार्सेकर यांना तर [संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार] ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांना जाहीर झाला आहे.

* मराठी रंगभूमी दिनाला हे पुरस्कार जाहीर केले जातात. त्यानुसार सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात या पुरस्काराची रविवारी घोषणा केली आहे.

* प्रत्येकी ५ लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुंबईतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे २० नोव्हेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण होईल असेही त्यांनी सांगितले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.