बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

भारतात मोबाईल वापरकर्त्यांची संख्या ९५.३८ कोटीवर - २३ नोव्हेंबर २०१७

भारतात मोबाईल वापरकर्त्यांची संख्या ९५.३८ कोटीवर - २३ नोव्हेंबर २०१७

* भारतीय दूरसंचार कंपनी संघटनेने [सीओएआय] नुकताच देशभरातील दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांच्या ग्राहकांच्या संख्येचा अहवाल सादर केला आहे.

* ही आकडेवारी ऑक्टोबर २०१७ महिन्यातील असल्याचे सीओआयने जाहीर केले आहे. सीओआय ने दिलेल्या माहितीनुसार भारतातील खासगी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांची एकूण ९५.३८ कोटी वापरकर्ते आहेत.

* भारती एअरटेलने पहिले स्थान कायम राखत सुमारे २९.९० टक्के हिस्सेदारी काबीज केली. एअरटेलच्या एकूण ग्राहक संख्या आता २८.५२ कोटी एवढी झाली आहे.

* एअरटेल नंतर वोडाफोन इंडिया लिमिटेडने ऑक्टोबर अखेर कंपनीचे एकूण ग्राहक २०.८३ एवढे ग्राहक आहेत. तर आयडिया सेल्युलरचे ग्राहक १९.०८ एवढे आहेत.

* तर मागच्या वर्षी सुरु झालेली मुकेश अंबानी यांची जियो कंपनीचे ग्राहक १३.८ कोटी आहेत.

* या अहवालात वैयक्तिक सर्कलसाठी मोबाईल ग्राहकांची आकडेवारी देण्यात आली आहे. यात देशात पूर्व उत्तर प्रदेश विभाग प्रथम स्थानी असून तेथील एकूण ग्राहक ८.३६ कोटी तर दुसऱ्या स्थानावर महाराष्ट्र विभाग असून त्याची एकूण ग्राहक संख्या ७.९४ एवढी आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.