गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०१७

देशात दिल्ली सर्वात असुरक्षित शहर - १ डिसेंबर २०१७

देशात दिल्ली सर्वात असुरक्षित शहर - १ डिसेंबर २०१७

* देशातील मोठ्या १९ शहरांच्या तुलनेत राजधानी दिल्ली विविध गुन्ह्यामध्ये आघाडीवर असल्याची बाब गुन्हे नोंदणी संस्थेच्या [एनसीआरबी] अहवालाद्वारे उघड झाली आहे.

* गेल्या वर्षी दिल्लीत बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे नोंदविले गेले आहेत. त्यामुळे दिल्ली सर्वात असुरक्षित शहर असल्याचे स्पष्ट झाले.

* दिल्लीत खून, अपहरण, आर्थिक, फसवणूक याबरोबर बाल गुन्ह्यामध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाली असून, मोठ्या शहरात महिलांवरील अत्याचारासंदर्भात नोंदवल्या गेलेल्या ४१ हजार ७६१ गुन्ह्यापैकीं ४०% म्हणजेच १३ हजार ८०३ गुन्हे एकट्या दिल्लीत दाखल झाले.

* त्यापाठोपाठ मुंबईचा क्रमांक लागला असून, मुंबईत अशा प्रकारचे ५ हजार १२८ गुन्हे दाखल झाले आहेत. सायबर कायद्याअंतर्गत ४ हजार १७२ गुन्हे एकट्या मुंबईत दाखल झाले आहेत.

* गुन्ह्याचे प्रमाण दिल्लीत ३८.८%, बंगळुरू ८.९%, मुंबईत ७.७% एवढे आहे. एकूण गुन्ह्यापैकीं २९% गुन्हे दिल्लीत घडले असून, राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत ७७.२ एवढा दिल्लीचा क्राईम रेट आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.