गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

मुंबई-पुणे दरम्यान हायपर लूप अतिजलद वाहतूक प्रकल्प येणार - १७ नोव्हेंबर २०१७

मुंबई-पुणे दरम्यान हायपर लूप अतिजलद वाहतूक प्रकल्प येणार - १७ नोव्हेंबर २०१७

* पुणे-मुंबई दरम्यान हायपरलूप या अतिजलद प्रवासाची सुविधा विकसित करण्यासाठी राज्य शासनाने तयारी सुरु केली आहे. त्यानुसार गुरुवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [पीएमआरडीए] आणि लॉस एंजिल्स येथील हायपरलूप कंपनीबरोबर करार करण्यात आला.

* या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी प्राथमिक स्तरावरील हा करार करण्यात असला तरी ही योजना पूर्ण झाल्यास पुण्यातून मुंबईला अवघ्या २० मिनिटात पोहोचणे शक्य होणार आहे.

* हायपर लूप हा वाहतुकीचा नवीन प्रकार असून, कमी दाबाच्या निर्वात पोकळीतून इलेक्ट्रो-चुंबकीय प्रणोदकामधून वाहतूक केली जाते. या प्रकारात एका तासात १ हजार ८० किमी वेगाने प्रवास करता येते.

* हायपरलुप ही कार्यक्षम, सुरक्षित व विश्वासार्ह वाहतूक प्रणाली आहे. पीएमआरडीएने केलेल्या सामंजस्य करारानुसार पुणे-मुंबई विभागातील मार्गाचे अभ्यास करण्यात येणार आहे.

* सध्या हायपर लूप आधारित ट्रान्सीट प्रोजेकट नेदरलँडमध्ये, अबूधाबी ते दुबई, स्टोकहोम ते हेलसिंगी येथे चालू आहे.

* भारतात महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश यांच्यात करार झाले आहेत. विजयवाडा आणि आंध्रप्रदेशची नवीन राजधानी अमरावती या दरम्यान हायपरलूप प्रकल्प होणार आहेत.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.