रविवार, २६ नोव्हेंबर, २०१७

डेमी नेल पीटर्स २०१७ ची मिस युनिव्हर्स - २७ नोव्हेंबर २०१७

डेमी नेल पीटर्स २०१७ ची मिस युनिव्हर्स - २७ नोव्हेंबर २०१७

* मिस युनिव्हर्स २०१७ चा किताब दक्षिण आफ्रिकेकडे गेला आहे. डेमी नेल पीटर्स ही २०१७ ची मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेती ठरली आहे.

* लासवेगास मध्ये झालेल्या सोहळ्यात मिस साऊथ आफ्रिका असलेल्या डेमी नेल पीटर्सला विजेती घोषित करण्यात आले.  फ्रांसच्या २०१६ च्या मिस आयरिस मिट्टीनेअर फ्रान्स हिने डेमीला मानाचा मुकुट प्रदान केला.

* दक्षिण आफ्रिकेच्या डेमी नेल हिला मिस जमैका डेविना बॅनेट आणि मिस कोलंबियाच लौरा गोन्जालेज तगड आव्हाहन होते.

* या स्पर्धेत मिस जमैका तिसरे स्थान मिळवले तर फर्स्ट रन अप मिस कोलंबिया झाली. मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावे करण्यासाठी जगभरातून ९२ सौंदर्यवतींनी भाग घेतला होता. अंतिम फेरीत आफ्रिका, जमैका, आणि कोलंबिया यांनी मजल मारली.

* मिस युनिव्हर्स स्पर्धेत श्रद्धा शशिधरने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पण टॉप १० ची यादी श्राद्धाला गाठता न आल्याने भारताकडे मिस युनिव्हर्सचा किताब येण्याचे स्वप्न तुटले.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.