शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

अभिलाषा म्हात्रे भारतीय कबड्डी संघाची कर्णधारपदी नियुक्त - १९ नोव्हेंबर २०१७

अभिलाषा म्हात्रे भारतीय कबड्डी संघाची कर्णधारपदी नियुक्त - १९ नोव्हेंबर २०१७

* आशियाई कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाचे नेतृत्व मुंबईच्या अभिलाषा म्हात्रेकडे सोपविण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशचा अजय ठाकूर पुरुष संघाचा कर्णधार असेल.

* आशियाई कबड्डी स्पर्धा २३ ते २६ नोव्हेंबर दरम्यान इराण येथे पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय कब्बडी महासंघाने हरियाणा येथील सराव शिबिरानंतर भारतीय संघाची घोषणा केली.

* कबड्डीच्या महिला संघात मुंबईच्याच सायली भगत आणि अभिलाषा हिचा समावेश आहे. पुरुष संघात एकही महाराष्ट्रातील पुरुषाला स्थान मिळाले नाही.

* सराव शिबिरासाठी महाराष्ट्राच्या रिशांक देवाडिया, काशिलिंगा आडके, आणि सचिन शिंगाडे पुरुष, तर अभिलाषा सायलीसह, पुण्याच्या पूजा शेलार या महाराष्ट्राच्या खेळाडूंची निवड झाली होती.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.