गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

स्टेट बँकेचे संपूर्ण बँकिंगसाठी योनो अँप सादर - २४ नोव्हेंबर २०१७

स्टेट बँकेचे संपूर्ण बँकिंगसाठी योनो अँप सादर - २४ नोव्हेंबर २०१७

* स्टेट बँक ऑफ इंडियाने बँकिंग, वित्त सेवा, ऑनलाईन खरेदी, प्रवासाची तिकिटे, ऑनलाईन खरेदी, विमा हे सर्व एका क्लिकवर काढता यावे यासाठी योनो अँप सादर करण्यात आले.

* या अँपमुळे संपूर्ण बँक आता मोबाईलवरच उपलब्द होणार आहे. व्हर्च्युअल मोबाईलची ही नांदी ठरणार आहे. अँड्रॉइड स्मार्ट फोनमधील इंटरनेट ऑफ थिंग्स या तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे.

* या अँप सोबत बँकेने ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ६० कंपन्यांना आम्ही एकत्रित केले आहे. याशिवाय ग्राहक याद्वारे स्टेट बँकेचे डिमॅट खाते, डेबिट क्रेडिट कार्डवरील व्यवहार व स्टेट बँकेचा विमा सुद्धा काढू शकतील.

* पुढच्या टप्प्यात म्युच्युअल फंड, व सामान्य विमा व्यवहारसुद्धा खातेदारांना योनो द्वारे करता येतील. अशी माहिती स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले आहे.

* भारतीय स्टेट बँक देशातील सगळ्यात मोठी बँक असून सध्या ३५ कोटी खातेदार आहेत. ४.३ कोटी ग्राहक इंटरनेट बँकिंग, २.६ कोटी मोबाईल बँकिंग, व १.२ कोटी खातेदार बँकेचे व्हॅलेट वापरतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.