मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

भारत हुशारीच्या बाबतीत जगात ५१ व्या स्थानावर - २२ नोव्हेंबर २०१७

भारत हुशारीच्या बाबतीत जगात ५१ व्या स्थानावर - २२ नोव्हेंबर २०१७

* प्रतिष्ठेच्या आयएमडी जागतिक सर्वेक्षण अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे. जागतिक टॅलेंटमध्ये भारताचा क्रमांक ५४ वरून ५१ वर आला आहे.

* आयएमडी वर्ल्ड टॅलेंट अहवालानुसार भारतीय टॅलेंट २०१३ पासून सातत्याने सुधारत आहे. भारताचा क्रमांक २०१४ मध्ये केवळ एका पायरीने खाली आला होता.

* आयएमडीने ६३ देशांची शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक व विकास, शिक्षणाची माहिती व शिक्षणासाठीची तयारी अशा तीन मुख्य श्रेणीत सर्वेक्षण केले.

* शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक आणि विकास श्रेणीत २९ वा क्रमांक आहे. एकूण क्रमवारीत भारतीय टॅलेंट ६३ देशामध्ये ५१ व्या स्थानी आहे.

* भारतात शिक्षणावर जीडीपीच्या ३% गुंतवणूक होत असून त्याची क्रमवारी ५८ वी आहे. भारतात प्रत्येक विद्यार्थ्यांवर जीडीपीच्या १६.८% खर्च होत असून, त्यात भारत ४५ व्या स्थानी आहे.

* जागतिक स्थिती सुधारली असली तरीही [ब्रिक्स] देशात भारत अदयापही चौथ्या स्थानी आहे. यात चीन ४०, रशिया ४३, दक्षिण आफ्रिका ४८ व्या स्थानी आहे. ब्राझील भारताच्या मागे ५२ व्या स्थानी आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.