गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

पुढील १०० वर्षात मुंबईला समुद्राचा धोका नासाचा अहवाल - १७ नोव्हेंबर २०१७

पुढील १०० वर्षात मुंबईला समुद्राचा धोका नासाचा अहवाल - १७ नोव्हेंबर २०१७

* जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढली असून त्यामुळे मुंबईला धोका असल्याचे नासाने म्हटले आहे. पुढील १०० वर्षामध्ये मुंबईजवळील अरबी समुद्रातील पाण्याची पातळी १५.२६ सेंटीमीटर वाढेल.

* यासोबतच कर्नाटकमधील मंगलोर आणि आंध्रप्रदेशमधील काकीनाडा या शहरांनाही समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे धोका असल्याचे नासाने म्हटले आहे.

* जागतिक तापमान वाढीमुळे पुढील १०० वर्षांमध्ये हिमनग वितळण्याची प्रक्रिया वेगात होईल. यामुळे जगभरातील महासागर, उपासमार, आणि समुद्रातील पातळीत वाढ होईल.

* येत्या १०० वर्षात टोकियो जवळील समुद्राच्या पातळीत १७.५५ सेंटिमीटरने वाढ होईल. असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

* भारतबद्दल विचार केल्यास मंगलोर जवळ अरबी समुद्राची पातळी १५.९८ सेमी तर आंध्रप्रदेश येथील काकीनाडा जवळच्या बंगालच्या उपसागरची पातळी १५.१६ सेंटिमीटरने वाढेल.

* नासाने ग्रॅंडिएट फिंगरप्रिंट मॅपिंगच्या साहाय्याने समुद्र पातळीत होणाऱ्या वाढीची आकडेवारी गोळा केली आहे. पुढील १०० वर्षात जगभरातील २९३ शहरासमोर येत्या काळात मोठे संकट उभे राहणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.