शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

४ थे शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत होणार - १८ नोव्हेंबर २०१७

४ थे शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत होणार - १८ नोव्हेंबर २०१७

* कल्पनाविश्वात रमणाऱ्या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी काही संबंध उरला नाही. याचा शोध घेण्यासाठी नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्द करून देणे.

* त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणीवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्य क्षेत्रातून कृषिजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देणे.

* यासाठी ३१ जानेवारी २०१८ रोजी पु ल देशपांडे कला अकादमी केंद्र येथे ४ थे शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत होणार आहे.

* संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व ग्रामीण साहित्यिक कवी डॉ. विठ्ठल वाघ भूषविणार आहेत. संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे हे स्वीकारतील.

* या संमेलनात आधुनिक शेती आणि शासकीय धोरण, स्वामिनाथन आयोग शेतीला तारक की मारक, शेतकरी विरोधी कार्यदयाचे जंगल, सावध ऐका पुढल्या हाका या विषयावर परिसंवाद व कविता होणार आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.