मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

अँपल कंपनीकडून भारतात पहिल्यांदाच कॅम्पस प्लेसमेंट - ८ नोव्हेंबर २०१७

अँपल कंपनीकडून भारतात पहिल्यांदाच कॅम्पस प्लेसमेंट - ८ नोव्हेंबर २०१७

* जगातली सर्वात मोठी कंपनी आणि टेक जगतातलं मोठं नाव अँपल पहिल्यांदाच भारतात कॅम्पस प्लेसमेंट करणार आहे.

* अँपल पहिल्यांदा आयआयटी हैद्राबादमध्ये कॅम्पस प्लेसमेंट करणार आहे. भारतातली ही पहिलीच संस्था आहे. ज्यामधून विद्यार्थ्यांना अँपल नोकरीची संधी देणार आहे.

* आयआयटी हैद्राबादचे प्लेसमेंट प्रमुख देवीप्रसाद यांनी याबाबत माहिती दिली आहे. अँपल येणार असल्यामुळे आनंद आहे.

* अँपलला कशा प्रकारचे विद्यार्थ्यांचा शोध आहे. हे सांगता येणार नाही. मात्र संस्थेतील विद्यार्थ्यांना ही आपली बौद्धिक क्षमता दाखवण्याची सर्वात चांगली संधी आहे.

* यावेळी बंगळुरू आणि हैद्राबाद कॅम्पस मधून प्लेसमेंट होतील. यावर्षी कंपन्यांची नजर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि ऑटोमोशन क्षेत्रावर राहील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.