रविवार, २६ नोव्हेंबर, २०१७

इस्रो सोडणार २०२० मध्ये [आदित्य एल-१] उपग्रह - २७ नोव्हेंबर २०१७

इस्रो सोडणार २०२० मध्ये [आदित्य एल-१] उपग्रह - २७ नोव्हेंबर २०१७

* अंतराळात मोक्याच्या ठिकाणाहून सूर्याचे निरीक्षण करून अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संघटना इस्रो २०१९ ते २०२० मध्ये आदित्य एल १ हा उपग्रह सोडणार आहे.

* उपग्रहाच्या प्रस्तावित नावातील आदित्य हे सूर्याचे नाव आहे. तर एल१ हे अंतराळातील त्याच्या स्थानाचे निदर्शक आहे. एल१ म्हणजे लॉंगरेंज पॉईंट हे स्थान पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर आहे.

* आदित्य हा उपग्रह तीन महिन्यात स्थानकापर्यंत पोहोचणार अशी अपेक्षा आहे. त्या स्थानकापर्यंत पोहोचल्यावर तो स्वतःभोवती घिरट्या घेत सूर्यनिरीक्षकाचे काम करेल.

* एल१ हे ठिकाण गुरुत्वीय शक्तीच्या अशा हद्दीवर आहे की तेथे आदित्य आपल्या कक्षेत स्थिर राहण्यासाठी फारशा ऊर्जेची गरज भासणार नाही.

* हे ठिकाण असे मोक्याचे असेल की तिथून सूर्य आदित्य कधीही नजरेआड जाणार नाही. अशा मोक्याच्या ठिकाणी असे मोक्याच्या क्षेत्राचे चुंबकीय निरीक्षण व अभ्यास करणारा पहिला आणि एकमेव उपग्रह असेल.

* एकूण १५०० किलो वजन, सर्वात मोठे [व्हिजिबल इमिशन लाईन कॉरोनाग्राफ] व्हीएलइसी वजन १७० किलो, सोलर अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप वजन ३५ किलो, अशा विविध यंत्रासह हा उपग्रह सज्ज होईल.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.