बुधवार, ८ नोव्हेंबर, २०१७

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालला विजतेपद - ९ नोव्हेंबर २०१७

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालला विजतेपद - ९ नोव्हेंबर २०१७

* भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने नागपूरमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं आहे.

* अंतिम फेरीत सायनाने पी व्ही सिंधूवर २१-१७, २७-२५ अशी मात करत आपल्या कारकिर्दीतील तिसरं राष्ट्रीय विजेतेपद पटकावलं.

* याआधी पुरुषांच्या अंतिम सामन्यात एच एस प्रणॉयने किदाम्बी श्रीकांतवर मात करून धक्कादायक निकालाची नोंद केली.

* पहिल्या सेटमध्ये सिंधू आणि सायना नेहवालमध्ये सावध पवित्रा घेत सुरुवात केली. दोन्ही खेळाडूंनी सामन्यात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला.

* मात्र दोघांनाही त्यात यश आलं नाही. एका क्षणापर्यंत पहिल्या सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी झालेली असताना सायनाने सेटमध्ये आघाडी घेतली.

* यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये सामना खिशात घालवण्यासाठी द्वंद्वद्वंद सुरु राहील. मात्र यावेळी सायनाने आपला सर्व अनुभव पणाला लावत दुसरा सेट २७-२५ अशा फरकाने जिंकत राष्ट्रीय स्पर्धेचं विजतेपद आपल्या नावावर केलं.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.