गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

काही नवीन चालू घडामोडी - १६ नोव्हेंबर २०१७

काही नवीन चालू घडामोडी - १६ नोव्हेंबर २०१७

* भारताचा टेनिसपटू लियांडर पेस याने पुरव राजाच्या सोब
तीने जेम्स कारेतानी-जॉन पॅट्रिक यांचा पराभव करताना नोक्सविले चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.

* लष्कराकडून लाईट कॉमबॅट विमान तेजस आणि अर्जुन रणगाड्याची निर्मिती थांबवण्याचा प्रस्ताव दिला आहे.

* केंद्र सरकारच्या [भारतनेट] या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी महाराष्ट्राला २,१७१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

* ज्येष्ठ नागरिकांना तसेच अंध व अपंगांना डिसेंबर अखेरपासून घरपोच प्राथमिक बँकिंग सेवा दया, असे रिझर्व्ह बँकेने सांगतिले.

* बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना या वर्षीच्या गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात [इफ्फि] पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आले.

* चार वेळा FIFA विश्वचषक जिंकणारा इटली देश यावेळी रशियात होणाऱ्या फिफा विश्वचषक २०१८ मध्ये खेळण्यास अपात्र ठरला आहे.

* स्लोव्हेनिया प्रजासत्ताक वर्तमान राष्ट्राध्यक्ष बारूत पाखोर यांनी देशात झालेली राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली.

* चीनने जगातील पहिला विद्युत जहाजाचे अनावरण केले असून जो केवळ दोन तासात चार्ज होऊन २००० टन माल घेऊन ८० किलोमीटर चालू शकते.

* पश्चिम बंगाल आणि उडिशा राज्यात चालू असलेली रसगुल्ला या पदार्थाची कायदेशीर हक्क लढाई पश्चिम बंगालने जिंकली असून रसगुल्ला हा पदार्थ पश्चिम बंगाल या राज्याचा भौगोलिक संकेत म्हणजेच [GI] होय.

* १० वी एशियाटिक आर्थिक समिट नेपाळ काठमांडू येथे [SAES] सुरू करण्यात आली. यात दक्षिण आशियाई देशात आर्थिक विकासासाठी चर्चा करण्यात येणार आहे.

* भारत २०१९ पर्यंत जगातील तिसरा सर्वात मोठा विमान बाजार बनणार आहे. सध्या भारत जगात विमान बाजारात चौथ्या स्थानावर आहे.

* भारताची स्टार जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्मकार हिला एनआयटी आगरताळाने डी-लिटची पदवी देऊन सन्मान केला आहे.

* नॅशनल एसोशिएशन ऑफ सॉफ्टवेअर एंड सर्व्हिसेज अर्थात [Nasscom] च्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला म्हणून देबजानी घोष म्हणून पुढील वर्षी मार्चमध्ये पदभार स्वीकारतील.

* रॉजर फेडररला २०१७ सालच्या सीजनचा [२०१७ ATP - वर्ल्ड टूर अवॉर्ड] ने सन्मानित करण्यात आले.

* UNHCR या बेघर लोकांना मानवतावादी संकल्पनेतून मदत करणाऱ्या संस्थेला मदर टेरेसा २०१७ सालचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.