शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

अक्षरधाम हल्ल्याच्या सूत्रधार अजमेरी अखेर अटकेत - ५ नोव्हेंबर २०१७

अक्षरधाम हल्ल्याच्या सूत्रधार अजमेरी अखेर अटकेत - ५ नोव्हेंबर २०१७

* गुजरातच्या गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिरावर २००२ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधार अब्दुल रशीद अजमेरी याला येथील विमानतळावर अटक करण्यात आली.

* रियाधमधून भारतात आलेल्या अजमेरीस शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

* आपल्या भावाला भेटण्यासाठी तो रियाधहून अहमदाबादला येत असल्याची माहिती आम्हाला आधीच मिळाली होती.

* अक्षरधामवरील हल्ल्याचे नियोजन आखण्याबरोबरच लष्करे तोयबा च्या हस्तकांना त्याने मदत केली होती.

* लष्करे तोयबा च्या दोन दहशतवाद्यानी २४ सप्टेंबर २००२ रोजी अक्षरधाम मंदिरावर केलेल्या हल्ल्यामध्ये ३२ जण ठार झाले होते. तर अन्य ८० जण जखमी झाले होते.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.