मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७

भारतात २०% गर्भवती महिलांना मधुमेह - १५ नोव्हेंबर २०१७

भारतात २०% गर्भवती महिलांना मधुमेह - १५ नोव्हेंबर २०१७

* महिलांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण आणि त्याकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेऊन [जागतिक आरोग्य संघटना] आणि आंतरराष्ट्रीय मधुमेह संघाने यंदाचे वर्ष [महिला व मधुमेह संघाने] यंदाचे वर्ष हे [महिला व मधुमेह वर्ष म्हणून जाहीर केले आहे.

* जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत असून जवळपास २०% गर्भवती महिलांना मधुमेह होत असल्याचे दिसून आले आहे.

* भारतात आजघडीला सहा कोटी ९२ लाख लोकांना मधुमेह असल्याची आकडेवारी असली तरी प्रत्यक्षात हे प्रमाण अधिक असल्याचे तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

* साधारणपणे लोकसंख्येच्या १०% लोक हे मधुमेही असून त्यात महिलांचे प्रमाण हे खूप मोठे आहे. भारतातील महिला व त्यातही गर्भवती महिलांमधील मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.

* भारतात २०१२ मध्ये १० लोकांचा मृत्यू हा मधुमेहामुळे निर्माण झालेल्या व्याधीमुळे झाला असून दर ९ महिलांपैकी एका महिलेचा मृत्यूमागेही मधुमेहामुळे उद्भवलेली व्याधी हेच त्याचे कारण आहे.

* जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार २०३० पर्यंत मधुमेह हे मृत्यूच्या कारणांपैकी सातवे महत्वाचे कारण ठरणार आहे.

* ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या जास्त असून गेल्या तीन दशकात हे प्रमाण १.२ टक्क्यावरून गेल्याचे इंटरनॅशनल डायबिटिक फेडरेशन च्या साऊथ ईस्ट विभागाचे अध्यक्ष डॉ अनिल भोरास्कर यांनी सांगितले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.