सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

चीनचे डीएफ-४१ आण्विक क्षेपणास्त्र लवकरच लष्करात दाखल - २१ नोव्हेंबर २०१७

चीनचे डीएफ-४१ आण्विक क्षेपणास्त्र लवकरच लष्करात दाखल - २१ नोव्हेंबर २०१७

* जगात कुठेही असलेल्या लक्ष्याच्या अचूक वेध घेऊ शकणारे [डाँगफेम - ४१] डिएफ-४१ हे अतिप्रगत आंतरखंडीय बॅलेस्टिक आण्विक क्षेपणास्त्र पुढील वर्षाच्या सुरवातीस चिनी लष्कराच्या सक्रिय सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

* चीनने हे क्षेपणास्त्र विकसित करण्यास सन २०१२ मध्ये सुरुवात केल्यापासून या महिन्याच्या सुरवातीस देशाच्या पश्चिमेकडील वाळवंटी प्रदेशात त्याची आठवी चाचणी घेण्यात आली.

* सरकारी ग्लोबल टाइम्सच्या मते हे क्षेपणास्त्र पीपल्स लिबरेशन आर्मीच्या रॉकेट फोर्स या क्षेपणास्त्र दलात सन २०१८ च्या पूर्वार्धात दाखल होण्याची शक्यता आहे.

* चीनच्या मुख्य भूमीवरून सोडलेल्या डिएफ-४१ च्या टप्प्यात जगातील कुठलेही लक्ष्य येऊ शकत असल्याने आक्रमक अस्त्राखेरीज इतरांवर वचक ठेवण्यासाठी चीनला या क्षेपणास्त्राचा सामरिक उपयोग होईल.

* [डीएफ-४१] ची वैशिष्ट्ये - कमाल पल्ला १२ हजार किमी, कमाल वेग १० मेंचहुन अधिक, प्रत्येक अणवस्त्रे स्वतंत्र लक्ष्यभेद शक्य घन इंधनटक्क्याचे तीन टप्पे.

* या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगाच्या दसपट [१० मॅच] असल्याने ते सोडल्यापासुन जेमतेम एका तासात जगातील कोणत्याही लक्ष्यापर्यंत पोहोचू शकते.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.