बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

कविता देवी WWE मधील पहिली भारतीय खेळाडू - १७ ऑक्टोबर २०१७

कविता देवी WWE मधील पहिली भारतीय खेळाडू - १७ ऑक्टोबर २०१७

* भारताच्या द ग्रेट खली आणि जिंदर महल यांच्यानंतर आता पॉवरलिप्टर चॅम्पियन कविता देवी WWE [वर्ल्ड रेसलिंग इंटरटेन्टमेंट] मध्ये सहभागी होणार आहे. 

* कविता देवी WWE मधील पहिली भारतीय खेळाडू ठरणार आहे. तिने यासंबंधी WWE बरोबर करार केला आहे. मूळची हरियाणाची असलेली खेळाडू तिने रेसलिंग व्यवसायिक प्रशिक्षण द ग्रेट खली यांच्या अकॅडमीत प्रशिक्षण पूर्ण केले आहे. 

* कविता देवीने २०१६ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत पॉवरलिपटींग देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. कविता देवीने यापूर्वी महिलांच्या मई यंग क्लासिक टूर्नामेंट सहभाग नोंदविला होता. 

* पुढीलवर्षी जानेवारी महिन्यापासून WWE च्या ओरलँडो येथील परफॉर्मन्स सेंटरमध्ये तिच्या प्रशिक्षणास सुरुवात होईल. 

* त्याचबरोबर WWE जॉर्डनची शादिया बेसींसोबरोबर करार केला असून, WWE च्या रिंगणात उतरणारी ती पहिली भारतीय अरब महिला ठरेल.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.