शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०१७

सौम्या स्वामिनाथन यांची WHO च्या उपमहासंचालकपदी - ७ ऑक्टोबर २०१७

सौम्या स्वामिनाथन यांची WHO च्या उपमहासंचालकपदी - ७ ऑक्टोबर २०१७

* प्रसिद्ध भारतीय बालरोगतज्ञ डॉ सौम्या स्वामिनाथन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक आरोग्य संघटना WHO च्या उपमहासंचालकपदी नियुक्ती झाली आहे.

* १४ देशातील विविध प्रतिनिधी डॉ सौम्या यांच्या कार्याची दखल घेऊन या महत्वाच्या मानाच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

* जागतिक आरोग्य संघटनेत एवढ्या मोठ्या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला आहेत. भारतीय हरितक्रांतीचे जनक व कृषी वैज्ञानिक डॉ एम एस स्वामीनाथन यांच्या त्या कन्या आहेत.

* त्या एक बालरोग तज्ञ असून दिल्ली एम्समधून येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले, काही वर्षे ब्रिटनमध्ये व कॅलिफोर्निया येथे नोकरी केली.

* सध्या त्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या [आयसीएमआर] महासंचालक आहेत. त्या भारतीय आरोग्य संशोधन विभागाच्या सचिवही आहेत. त्यांनी युनिसेफसाठीही काम केले आहे.

* त्यांना लाहिरी सुवर्णपदक, कनिष्का पुरस्कार, इंडियन असोशिएशन ऑफ अप्लाइड सायन्स पुरस्कार आदी पुरस्करानी सन्मानित करण्यात आले आहे.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.