बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

FTII च्या अध्यक्षपदी अनुपम खेर यांची नियुक्ती - १२ ऑक्टोबर २०१७

FTII च्या अध्यक्षपदी अनुपम खेर यांची नियुक्ती - १२ ऑक्टोबर २०१७

* बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या [FTII] अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने गजेंद्र चौहान यांना हटवून खेर यांची नियुक्ती केली आहे.

* गजेंद्र चौहान यांची २०१५ मध्ये FTII चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. परंतु त्यांच्या विरुद्ध विद्यार्थ्यांनी निदर्शने करत त्यांची हकालपट्टी मागणी केली.

* FTII ने चित्रपट सृष्टीला अनेक मातब्बर कलाकार व तंत्रज्ञ दिले आहेत. या संस्थेचे अध्यक्षपद भूषविण्यास गजेंद्र चौहान पात्र नाहीत असा आंदोलनकर्त्याचा दावा होता.

* अनुपम खेर यांनीही चौहान यांच्या नियुक्तीला विरोध केला होता. त्यांच्या जागी अखेर चौहान यांची मुदत संपल्यानंतर खेर यांची नियुक्ती करण्यात आली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.