सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

काही वाहतूक-दळणवळण नवीन चालू घडामोडी - १० ऑक्टोबर २०१७

काही वाहतूक-दळणवळण नवीन चालू घडामोडी - १० ऑक्टोबर २०१७

* पदमविभूषण डॉ बिंदेश्वर पाठक हे भारतीय रेल्वेचे स्वछता दूत म्हणून नेमणूक करण्यात आली.

* भारतातील पहिले खाजगी रेल्वे स्थानक मध्य प्रदेश राज्यात आहे.

* बायोसीएनजी\बायोमिथेन इंधनावर चालणारी पहिली बस टाटा मोटर्सने विकसित केली आहे.

* श्रद्धा सेतू एक्स्प्रेसवे - अयोध्या ते रामेश्वरम साप्ताहिक रेल्वे एक्सप्रेस भारतातील तीर्थक्षेत्रे जोडणारी ही रेल्वेगाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामेश्वरम येथून २७ जुलै २०१७ रोजी सुरु करण्यात आली.

* देहू ते पंढरपूर या मार्गाला - संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, आळंदी ते पंढरपूर - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, शेगाव ते पंढरपूर - संत गजानन महाराज पालखी मार्ग असे नामकरण करण्यात आले. या सर्व मार्गाचे नूतनीकरण चालू आहे.

* जगातील पहिली पर्यावरणस्नेही मेट्रो यंत्रणा उभारण्याचा पहिला मान मिळालेले भारतातील पहिले शहर नवी दिल्ली मेट्रो हे होय.

* भारतातील पहिले पर्यटन वाढीसाठी क्रूझ टर्मिनस साठी गृह बंदर होमपोर्ट म्हणून पहिले बंदर मुंबई होय.

* भारतात सध्या मेट्रो रेल्वेची कामे सुरु असणारी शहरे - दिल्ली, मुबंई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैद्राबाद, अहमदाबाद, पुणे, जयपूर, लखनौ, नागपूर, कोचीन, गुडगाव/गुरुग्राम हे आहेत.

* सिल्क रोडची संकल्पना मांडणारा देश चीन आहे.

* बीएस - ५ मानक दर्जाचे इंधन भारत सरकार ३१ मार्च २०२० पर्यंत वापरणार, तर बीएस ६ हे १ एप्रिल २०२० पासून वापरण्यास सुरुवात करणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.