शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

अहवाल - ग्रामीण भारताच्या तुलनेत शहरी भागाचा दैनंदिन खर्च जास्त - २१ ऑक्टोबर २०१७

अहवाल - ग्रामीण भारताच्या तुलनेत शहरी भागाचा दैनंदिन खर्च जास्त - २१ ऑक्टोबर २०१७

* ग्रामीण भारताच्या तुलनेत शहरी भागाचा दैनंदिन खर्चाचे प्रमाण ८४ टक्क्यांनी जास्त असल्याची बाब समोर आली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने देशातील नागरिकांच्या खर्चाबद्दल सादर केलेल्या अहवालात नमुद करण्यात आले.

* मासिक दरडोई उत्पन्नाच्या आधारे [एमपीसीई] नागरिकांच्या जीवनशैलीचा दर्जा ठरवला जातो. त्यानुसार सध्या शहरी भागातील दरडोई खर्चाची रक्कम २,६३० इतकी आहे.

* ग्रामीण भागाच्या तुलनेत हे प्रमाण ८४ टक्कयांनी जास्त आहे. ग्रामीण नागरिकांचा महिन्याचा दरडोई खर्च १,४३० इतका आहे.

* मात्र मुस्लिम समाजाचा विचार करायचा झाल्यास ग्रामीण आणि शहरी नागरिकांच्या दैनंदिन खर्चातील तफावत कमी आहे. एकूण खर्चाचा विचार करता मुस्लिम नागरिक दैनंदिन खर्चाला कमी प्राधान्य देत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.

* तर हिंदू समाजातील शहरे आणि ग्रामीण नागरिकांच्या खर्चात ४७.३६ टक्के तफावत आढळून आली आहे. तसेच मुस्लिम समाजात गरिबीचे प्रमाण सर्वाधिक आहे.

* या समाजातील नागरिक दैनंदिन खर्चापेक्षा खाण्याच्या गोष्टीवर अधिक पैसे खर्च करतात. दैनंदित खर्चाचे प्रमाण जसजसे वाढत जाईल तसतसे खाण्याच्या गोष्टींवरील खर्चाचे प्रमाण कमी होते.

* ग्रामीण नागरिक खाण्याच्या गोष्टीवर सरासरी ५२.९ टक्के इतके पैसे खर्च करतात. ग्रामीण मुस्लिमांमध्ये हेच प्रमाण ५९.३% इतके आहे.

* तर शहरी भागातील मुस्लिम खाण्यावर साधारणतः ४९.५% इतके पैसे खर्च करतात. शहरी भागातील नागरिकांकडून खाण्याच्या गोष्टीवर साधारणतः ४२.६% खर्च केला जातो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.