बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

देशातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू - १२ ऑक्टोबर २०१७

देशातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू - १२ ऑक्टोबर २०१७

* देशातील प्राध्यापकांना ७ व्या वेतन आयोगाची दिवाळी भेट सरकारने दिली आहे. केंद्रीय विद्यापीठे, राज्यामधील विद्यापीठे, आणि आयआयटी, आयआयएम सारख्या सरकारी ७.५८ लाख प्राध्यापकांना १ जानेवारी २०१६ पासून १० ते ५० हजार वाढ मिळणार आहे.

* यामुळे प्राध्यापकांच्या पगारात २२ ते २८ टक्क्यांची वाढ होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

* देशभरात १००% अनुदान असलेल्या केंद्रीय विद्यापीठे, आयआयटी, आयआयएम सारख्या २१३ संस्था आहेत. त्यातील ५८ हजार प्राध्यापकांना तर राज्यामधील ३२९ विद्यापीठे व १२ हजार ९१२ महाविद्यालयातील प्राध्यापकांना वेतनवाढ लागू होईल.

* सुधारित वेतन पुढीलप्रमाणे - सहायक प्राध्यापक [एंट्री लेव्हल] - ५७०००, सहायक प्राध्यापक - ८००००, वरिष्ठ सहायक प्राध्यापक १३१०००, प्राध्यापक - १४४०००, वरिष्ठ प्राध्यापक - १८२०००, कुलगुरु - २२५०००.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.