सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

जॉन केनेडी हत्या प्रकरणातील फाईल्स प्रसिद्ध - २९ ऑक्टोबर २०१७

जॉन केनेडी हत्या प्रकरणातील फाईल्स प्रसिद्ध - २९ ऑक्टोबर २०१७

* अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या हत्या प्रकरणातील सुमारे २८०० फाईल्स अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रसिद्ध केल्या आहेत.

* अर्थात एफबीआय आणि सीआयएने सुरक्षेच्या कारणास्तव आक्षेप घेतल्यानंतर इतर फाईल्स जाहीर करणे. थांबविण्यात आले.

* २२ नोव्हेंबर १९६३ रोजी टेक्सस राज्यातील डल्लास येथे केनेडी यांची हत्या करण्यात आली होती.

* गेल्या सहा दशकामध्ये केनेडी यांच्या हत्येमध्ये नेमका कोणाचा सहभाग असेल. याबाबत अमेरिकन जनमानसात याबाबत नेहमीच तर्कवितर्क उपस्थित केले जात होते.

* मात्र या फाईल्स उघड केल्यानंतरही फारसे काही मिळण्याची शक्यता नाही असे तंज्ञानी मत व्यक्त केले आहे.

* जॉन केनेडी यांच्याबद्दल

* केनेडी यांचे पूर्ण नाव जॉन फिटझरगेराल्ड केनेडी असे होते. त्यांचा जन्म २९ मे १९१७ रोजी मॅसॅच्युएट्समधील ब्रुकलिन येथे झाला.

* अमेरिकन नौदलात लेफ्टनंट पदावरती असणाऱ्या केनेडी यांनी दुसऱ्या महायुद्धसह अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता.

* केनेडी हे १९४७ ते १९५३ याकाळात संसदेच्या कनिष्ठ सभागृहात तर १९५३ ते १९६० या काळात वरिष्ठ सभागृहात सदस्य म्हणून कार्यरत होते.

* १९६१ साली आयसेनहॉवर यांच्यानंतर ते अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांच्या हत्येनंतर उपराष्ट्राध्यक्ष असणारे लिंडन जॉन्सन राष्ट्राध्यक्ष झाले.

* केनेडी यांच्या हत्येनंतर अनेक सरकरांनी या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले. पण सर्व तपास आयोगांनी केनेडी यांची हत्या ली हार्वे ऑस्वाल्डने टेक्सस स्कुल बुक डिपॉझिटरी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून तीन गोळ्या झाडून केली असा निष्कर्ष मांडला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.