सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

वैद्यकशास्त्रातील २०१७ नोबेल पारितोषिक पुरस्कार जाहीर - ३ ऑक्टोबर २०१७

वैद्यकशास्त्रातील २०१७ नोबेल पारितोषिक पुरस्कार जाहीर - ३ ऑक्टोबर २०१७

* वैद्यकशास्त्रातील यंदाचा प्रतिष्टेचा नोबेल पुरस्कार जेफ्री सी. हॉल, मायकेल रोशबॅश व मायकेल यंग या ३ अमेरिकन संशोधकांना जाहीर झाला आहे. [ अंतर्गत जैविक घड्याळ ] यामधील महत्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

* [ काय आहे संशोधन ]

* जैविक घड्याळ सजीवांमधील झोपेची पद्धत, खाण्यापिण्याच्या सवयी, हार्मोन्सची निर्मिती आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत करते. हे संशोधकांनी सिद्ध केले.

* सजीवांतील हे अंतर्गत घड्याळ आणि बाह्य वातावरण यांच्याद्वारे बदल झाल्यास त्याचा सजीवावर परिणाम होतो.

* यासाठी उदाहरणादाखल त्यांनी एखादे जेट विमान जोराचा आवाज करीत आपल्या डोक्यावरून गेल्यानंतर होणाऱ्या अवस्थेचा दाखला दिला आहे.

* या तिन्ही संशोधकाच्या पथकाने सजीवातील या अंतर्गत घड्याळामधील विविध प्रकारची जनुके आणि प्रथिनांचा शोध लावला आहे.

* हे जैविक घड्याळ सजीवातील झोप आणि झोपेतून उठण्याचा चक्राला कसे नियंत्रित करते. हे या संशोधकांनी सिद्ध केले. वनस्पती, मानव तसेच प्राणी त्यांच्या शरीरामधील जैविक प्रक्रिया पृथ्वीच्या परिक्रमाशी कशा प्रकारे जुळवून घेतात हे या संशोधनातून स्पष्ट होते.

* सजीवांतील [अंतर्गत घड्याळ ] कशा प्रकारे काम करते, हे या संशोधकांनी दाखवून दिले. यांनी फळावर माश्यांचा [फ्रुट फ्लाईज] यांचा वापर केला आहे.

* [नोबेल पारितोषिक वैशिट्ये]

* दरवर्षी सर्वप्रथम वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर केले जाते. नंतर विज्ञान, साहित्य आणि जागतिक शांतता या क्षेत्रातील कार्यासाठी नोबेल प्रदान करण्यात येतो.

* १०८ व्या नोबेल पुरस्काराची येथील कारोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील नोबेल समितीच्या व्यासपीठावरून सोमवारी घोषणा करण्यात आली.

* या पुरस्कारांतर्गत या संशोधकांचे नाव असलेले नोबेलचे मानचिन्ह तसेच ८ लाख २५ हजार पौंडाची रक्कम सुमारे [७ कोटी] रक्कम तीन संशोधकांना विभागून देण्यात येते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.