शनिवार, १४ ऑक्टोबर, २०१७

देशातील २० विद्यापिठे जागतिक दर्जाची बनविणार - १५ ऑक्टोबर २०१७

देशातील २० विद्यापिठे जागतिक दर्जाची बनविणार - १५ ऑक्टोबर २०१७

* जगातील प्रमुख ५०० विद्यापीठामध्ये भारतातील एकाही विद्यापीठांचा समावेश नसल्याबद्दल खंत व्यक्त करताना  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले देशातील १० खासगी आणि १० सरकारी अशा २० विद्यापीठांना सरकारी बंधनातून स्वतंत्र करून ती आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवण्यात येतील.

* त्यासाठी येत्या ५ वर्षात १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदतही देण्यात येईल. देशात प्रथमच आयआयएमला सरकारी नियंत्रणातून बाहेर काढून स्वतंत्र केले आहे. हा मोठा निर्णय आहे. तसेच भारतीय आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत.

* जागतिक दर्जा मिळावा यासाठी विद्यापीठातील प्रशासक, अध्यापक संशोधक व विद्यार्थी यांनीच पुढाकार घ्यायला हवा.

* ज्या देशात नालंदा, विक्रमशिला, तक्षशिला, यासारखे १३००, १५००, आणि १७०० वर्षांपूर्वीची विद्यापीठे जगाला आकर्षित करत होती.

* यासाठी केंद्र सरकार येत्या ५ वर्षात १० हजार कोटी रुपये निधी उभारून देशातील २० विद्यापीठे जागतिक दर्जाची करणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.