रविवार, २२ ऑक्टोबर, २०१७

रो-रो नौकासेवेचे मोदींकडून गुजरातमध्ये उदघाटन - २३ ऑक्टोबर २०१७

रो-रो नौकासेवेचे मोदींकडून गुजरातमध्ये उदघाटन - २३ ऑक्टोबर २०१७

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात रोल ऑन रोल ऑफ [रोरो] नौका सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन केले. 

* या प्रकल्पासाठी ६१५ कोटी रुपयाचा खर्च झाला आहे. भारतातील तसेच दक्षिण आशियातील अशा प्रकराची हि पहिलीच सेवा आहे. 

* घोघा भरूच व दहेज दरम्यान हा प्रकल्प असून रस्ते मार्गाने दोन्ही शहरातील ३१० किमी असलेले अंतर या नौका सेवेमुळे घटून ३० किमी इतके होईल. 

* या फेरीसेवेमुळे रस्त्यावरून होणारा आठ तासाचा प्रवास फेरी बोटीने समुद्रमार्गे केवळ एका तासात होऊ शकतो. तसेच जी वस्तू रस्ते मार्गाने नेण्यासाठी दीड रुपये खर्च येत होता तेच साहित्य जल मार्गाने नेण्यासाठी फक्त २० ते २५ खर्च येईल. 

* याशिवाय या प्रकल्पामुळे इंधन बचत, प्रवास व वाहतूक खर्च कमी झाल्याने व्यापारवाढ, रोजगार निर्मिती, पर्यटन क्षेत्राचा विकास हे फायदेदेखील गुजरातला मिळणार आहेत. 

* या सेवेमुळे सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरात समुद्र मार्गाने जोडले जाणार आहे. यामध्ये एका फेरीत ५०० हुन अधिक लोक आणि सुमारे १०० कार आणि ट्रक नेता येतील. 

* भविष्यात मुंबई आणि दक्षिणेतील राज्ये यांनाही या सेवेद्वारे जोडण्याचा सरकारचा विचार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.