शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

जगभरात प्रदूषणामुळे दरवर्षी ९० लाख मृत्यू - २१ ऑक्टोबर २०१७

जगभरात प्रदूषणामुळे दरवर्षी ९० लाख मृत्यू - २१ ऑक्टोबर २०१७

* हवा, पाणी, आणि अन्य प्रकारच्या प्रदूषणामुळे २०१५ मध्ये जगभरात ९० लाख तर भारतात २५ लाख मृत्यू झाला आहे. असे लॅन्सेट जर्नलने शुक्रवारी प्रकाशित केलेल्या अहवालात दिली आहे.

* २०१५ मध्ये जगभरात ६५ लाख लोक वायू प्रदूषणाला बळी पडले. पाण्यातील प्रदूषणामुळे १८ लाख लोकांना मृत्यूच्या दाढेत नेले.

* कमी आणि माध्यम उत्पन्न असलेल्या देशामध्ये ९२% मृत्यू हवेतील प्रदूषणामुळे झाले असल्याचे आयआयटी दिल्ली आणि अमेरिकेच्या इकानस्कुल ऑफ मेडिसिन या संशोधकांनी सांगितले.

* यातील बहुतांश मृत्यू असंसर्गजन्य आजारातून झाले. प्रदूषणामुळे हृदयरोग, पक्षाघात, फुफुस्साचा कॅन्सर, श्वसनाच्या दुर्धर आजारामुळे बहुतांश लोक मृत्युमुखी पडले. हवेच्या प्रदूषणाचा सर्वात मोठा वाटा त्यात आहे.

* भारत, पाकिस्तान, चीन, बांगलादेश, मादागास्कर, आणि केनियात उद्योग झपाट्याने वाढत असून चारपैकी एक मृत्यू प्रदूषणामुळे होतो.

* अकाली मृत्यूसाठी सर्वात धोकादायक ठरणाऱ्या घटकामध्ये प्रदूषणाचा वाटा सर्वाधिक घरात आणि घराबाहेर होणारे प्रदूषण तसेच रासायनिक प्रदूषण कारणीभूत.

* गरीब व मध्यमवर्गीय यांना सर्वाधिक फटका, कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगारांना न्यूमोनिसीसचा धोका. रंगकाम करणार्यांना ब्लॅडर कँसर फुफुस्साचा आजार. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.