मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७

भारताचा विकासदर ६.७% राहण्याचा आयएमएफचा अंदाज - ११ ऑक्टोबर २०१७

भारताचा विकासदर ६.७% राहण्याचा आयएमएफचा अंदाज - ११ ऑक्टोबर २०१७

* आंतराष्ट्रीय नाणेनिधी आयएमएफ चालू वर्षी भारताचा विकासदर ६.७% राहणार आहे. आयएमएफ ने एप्रिल आणि जुलै महिन्यात वर्तविलेल्या अंदाजापेक्षा यामध्ये ०.५% घसरण झाली आहे.

* आगामी आर्थिक वर्ष २०१८ मध्ये भारताचा आर्थिक विकास दर ७.४% राहणार असल्याचा अंदाजही आयएमएफ ने वर्तविला आहे.

* नोटबंदी आणि वस्तू व सेवाकराच्या जीएसटी अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेचा पाय खोलात जात असल्याचे आयएमएफ च्या जागतिक आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

* जूनच्या तिमाहीत भारताचा विकासदर ५.६% यावर आला होता. भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. देशात लागू करण्यात आलेला जीएसटी कर आणि चलन विनिमय धोरणांचे रेंगाळेपणा यासाठी कारणीभूत असल्याचे आयएमएफच्या अहवालात म्हटले आहे.

* सरकारच्या विविध योजनांवर मोठ्या प्रमाणावर करण्यात येणारा खर्च आणि माहितीच्या नूतनीकरणामुळे २०१६ मध्ये आर्थिक विकासदरात वाढ झाल्याचे आयएमएफच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

* आयएमएफच्या अहवालानुसार सध्या जागतिक विकासाला मरगळ आल्याचे चित्र आहे. चालू आर्थिक वर्षांमध्ये जागतिक विकासदर ३.७% राहण्याचा अंदाज वर्तविला आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.