शनिवार, २१ ऑक्टोबर, २०१७

केंदाची योजना - वर्षाअखेर देशभरात साडेसात लाख हॉटस्पॉट - २२ ऑक्टोबर २०१७

केंदाची योजना - वर्षाअखेर देशभरात साडेसात लाख हॉटस्पॉट - २२ ऑक्टोबर २०१७

* डिजिटल इंडियासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलण्याचे ठरवले असून पुढील वर्षाअखेर कमीतकमी साडेसात लाख पब्लिक इंटरनेट हॉटस्पॉट प्रस्थापित केले जाणार आहे.

* निमशहरी तसेच ग्रामीण भागात हायस्पीड इंटरनेट सुविधा सुरु करण्यासाठी ही योजना आहे. यासाठी खासगी कंपन्याही इंटरनेट सेवा देणार आहेत.

* विविध इंटरनेट प्रोव्हायडर्स व्यतिरिक्त रिलायन्स जियो, एअरटेल, वोडाफोन, आयडिया व सरकारी कंपनी बीएसएनएल व सरकारी कंपन्या यांच्या मदतीने ही योजना राबविली जाणार आहे.

* जगातील अनेक देशामध्ये डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचे मूळ हे वायफाय सिविधा आहे. पण भारत त्यात खूप मागे आहे.

* भारतात २०१६ पर्यंत केवळ ३१ हजार हॉटस्पॉट होते तर फ्रान्समध्ये १ कोटी ३ लाख, अमेरिकेमध्ये ९८ लाख, तर ब्रिटनमध्ये ५६ लाख हॉटस्पॉट होते.

* ग्रामपंचायतीमध्ये फायबर ऑप्टिक नेटवर्क पसरविण्याचे काम सध्या सुरु आहे. आतापर्यंत ७५ हजार ग्रामपंचायतीचे हे काम पूर्ण झाले आहे. या डिसेंबरपर्यंत १ लाख ग्रामपंचायतीत फायबर नेटवर्क पसरविण्याचा संकल्प केला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.