गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०१७

एमपीएससी आता गट 'क' पदासाठी संयुक्त परीक्षा पद्धत राबविणार - २६ ऑक्टोबर २०१७

एमपीएससी आता गट 'क' पदासाठी संयुक्त परीक्षा पद्धत राबविणार - २६ ऑक्टोबर २०१७

* सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकपदासाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेतल्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता गट 'क' पदासाठी संयुक्त परीक्षा पद्धत राबविणार आहे.

* याबाबतचे निवेदन आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे.

* संयुक्त परीक्षेचा हा यशस्वी फॉर्मुला यशस्वी झाल्यामुळे आयोगाने आता गट 'क' पदासाठीही याच पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

* त्यानुसार दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक व बृहन्मुंबईतील विविध शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक या संवर्गातील पदे भरण्यासाठी २०१८ पासून संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे.

* त्यात जाहिरातीला अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून ते यापैकी एक, दोन किंवा तिनही पदासाठी बसू इच्छितात काय याचा विकल्प भरून घेण्यात येईल.

* भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवाराची संख्या निश्चित केली जाईल. पूर्व परीक्षेचे निकाल मात्र स्वतंत्र जाहीर होतील.

* पूर्व परीक्षेचे निकाल मात्र स्वतंत्र जाहीर केले जातील. मुख्य परीक्षा प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र घेतली जाईल. मुख्य परीक्षेचे सविस्तर निवेदन आयोगातर्फे लवकरच जाहीर होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.